Uruli Kanchan News : पोलीस भरतीचे स्वप्न हे स्वप्नच राहिले, उरुळी कांचन येथील २५ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, कारण..
Uruli Kanchan News उरुळी कांचन : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उरुळी कांचन येथील तरुणीने टोकाचे पाऊल उचले आहे. एका २५ वर्षीय तरुणीने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. Uruli Kanchan News
सोनाली असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील टिळेकरमळा परिसरातील जिल्हा परिषद शाळेजवळ सोमवारी (ता. ९) ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारी तरुणी उरुळी कांचन येथे राहते. सोनाली हिचे काही वर्षापूर्वी लग्न होऊन तिचा घटस्फोट झाला होता. ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. तसेच सोनाली मागील काही दिवसांपासून बारामती येथील पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात पोलीस भरतीची तयारीही करत होती.
असे असताना मात्र, या तरुणीने सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ च्या दरम्यान घरी कोणी नसताना ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्यानं खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनास्थळी लोणी काळभोर पोलिसांनी भेट दिली असून, पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, सोनालीने आत्महत्या का केली यांचे कारण अजूनही समजू शकलेले नाही. तिच्या जाण्याने तिच्या घरच्यांवर दुःखाचे डोगर कोसळले आहे. तिने घेतलेल्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.