Uruli Kanchan News : पोहण्याचा मोह जिवावर बेतला! १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, प्रयागधाम येथील घटनेने हळहळ…


Uruli Kanchan News : एका १५ वर्षीय मुलाचा तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना प्रयागधाम (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळ्यामध्ये सोमवारी (ता.११) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मृत मुलगा परप्रांतीय असून, त्याचे नाव व पत्ता अद्याप समजू शकले नाही.

मिळालेल्या माहिती नुसार, प्रयागधाम याठिकाणी कामगार कॉलनी आहे. या कामगार कॉलनीत अनेक परप्रांतीय मजूर राहतात. तसेच रस्त्याच्या बाजूला एक तळे आहे. या तळ्यात हा मुलगा एक वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता.

खूप वेळ झाला तरी मुलगा घरी येत नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला. परंतु तो आढळला नाही. तो पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी असलेल्या काही नागरिकांच्या मदतीने मृतदेह दुपारी बाहेर काढण्यात आला., त्याला पोहता येत नसतानाही तो तळ्यात उतरला. Uruli Kanchan News

तसेच त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे त्याठिकाणी असलेले नागरिक सांगत होते. या वेळी परिसरातील नागरिकांनी तळ्याच्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!