Uruli Kanchan : बहुचर्चित कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगेश कानकाटे! नऊ महिन्यानंतर सरपंच पदाचा मार्ग मोकळा..!!


Uruli Kanchan उरुळीकांचन : सापशिडीच्या चालीने गेली नऊ वर्षे कोरेगावमूळ (ता.हवेली ) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या खुर्चीचा रंगलेला संघर्षाचा अखेर संपुष्टात आला आहे.

सरपंचापदाचा अविश्वास ठरावाचा वैधता तहसीलदार ते सर्वोच्च न्यायालय पर्यंत ताणलेला खुर्चीचा न्यायनिवाडा सर्वोच्च न्यायालयाने केल्या नंतर बहुचर्चित कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगेश अशोक कानकाटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्या विरोधात २२ फेब्रुवारी २०२३ रोजी हवेलीचे तहसिलदार किरण सुरवसे यांनी मंजूर केलेला 10 विरुद्ध 3 मतांनी असा अविश्वास ठरावावर पुणे जिल्हाधिकारी, मुंबई उच्च न्यायालय व थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत ताणला गेला होता. ठराव वैधता आणि अवैधेतेवर दोन्ही बाजूंनी शर्थीने लढाई न्यायालयात सुरू होती.

सापशिडीच्या खेळाप्रमाणे वर खाली असा गेली नऊ महिने ठरावावर कायदेशीर वैधतेवर लढाई सुरू होती. अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत या ठरावाला वैधतेची मोहर उठ ल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर गुरुवार (दि.९) रोजी निवडणूक पार पडली. Uruli Kanchan

उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नूरजहाँ शेख यांच्या अध्यक्षपदाखाली झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मंगेश अशोक कानकाटे यांचा एकमेव अर्ज आल्याने नूरजहाँ शेख यांनी कानकाटे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

दरम्यान, मंगेश कानकाटे यांची सरपंचपदी निवड होताच, कार्यकत्यांनी गुलालाची उधळून करून एकच जल्लोष केला. तर ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच मंगेश कानकाटे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब बोधे, विठ्ठल शितोळे, दत्तात्रय काकडे, सचिन निकाळजे, वैशाली सावंत, भानुदास जेथे, लीलावती बोधे, राधिका काकडे, मंगल पवार, मनीषा कड, अश्विनी कड, पल्लवी नाझीरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!