Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खुनप्रकरण! मुख्य आरोपी बाळासाहेब खेडेकर यांचा येरवडा कारागृहात मृत्यू..


Uruli Kanchan उरुळी कांचन : उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथील प्रसिद्ध ‘गारवा हॉटेल’चे मालक रामदास आखाडे यांच्या खुन प्रकरणातील मुख्य आरोपीची हृदयविकाराच्या झटक्याने येरवडा कारागृहात बुधवारी (ता. १३) पहाटे निधन झाल्याची माहिती आहे.

मुख्य आरोपी व हॉटेल अशोकाचे मालक बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ५८, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे. येरवडा कारागृहात त्याचे निधन झाले आहे. (Uruli Kanchan)

उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथील प्रसिद्ध ‘गारवा हॉटेल’चे मालक रामदास आखाडे यांच्यावर १८ जुलै २०२१ रात्री पावणे नऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तलवारीने सपासप वार केले होते.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आखाडेंचा २१ जुलै २०२१ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तपासादरम्यान पोलिसांनी अशोका हॉटेलचे मालक जयवंत बाळसाहेब खेडेकरसह १० जणांना अटक केली होती.

दरम्यान, त्यांच्याकडे चौकशी केली असता हा खून हॉटेलचा व्यवसाय वाढावा म्हणून सदरचा खुन घडवुन आणल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या घटनेने परिसरात मात्र येथे चांगलीच खळबळ उडाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!