Uruli Kanchan : महादेव कांचन फार्मासिटीकल महाविद्यालयाचा ९७ टक्के इतका निकाल! वैयक्तिक गुणांची कामगिरीही उंचावली…
Uruli Kanchan : उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या शिक्षण संस्थेच्या अंतिम वर्षातील विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा २०२४ चा निकाल ९७ टक्के इतका उच्चांकी लागला आहे.
विद्यापीठाच्या उन्हाळी फार्मसी विभागाचा वर्ष २०२४ च्या निकालात अपेक्षेप्रमाणे महाविद्यालयाने मोठे यश संपादन केले आहे. या महाविद्यालयातून प्रथम क्रमांकावर कल्याणी हंबीर आणि साक्षी शिंदे यांनी 8.91 SGPA मिळवून चमकदार कामगिरी केली आहे. द्वितीय क्रमांकावर कीर्ती शितोळे, ऋतुजा देशमुख, आणि आविष्कार कामठे यांनी 8.73 SGPA मिळवले आहे.
तृतीय क्रमांकावर अथर्व कुदलेने 8.64 SGPA प्राप्त केले आहे. तर चौथ्या क्रमांकावर बेहल पाटीलने 8.55 SGPA मिळवले आहे. पाचव्या क्रमांकावर अक्षदा पगले सानिका नागबडे, वैभवी घोलप, संगीता चौधरी आणि सूरज नेलवडे यांनी 8.45 SGPA प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नितीन गवई यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले की, या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, महाविद्यालयातील प्राध्यापकांची मार्गदर्शन, आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक दृष्टीकोनाला जाते. हे निकाल विद्यार्थ्यांच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष महादेव कांचन, सचिव अजिंक्य दादा कांचन, आणि डायरेक्टर आप्पासाहेब जगदाळे यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आणि त्यांच्या पुडील शैक्षणिक व व्यावसायिक आयुष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या.