Uruli Kanchan : उरुळीकांचन स्वतंत्र ग्रामीण पोलिस ठाण्याला उद्घाटनाची वेटींग! नियोजनाप्रमाणे अधिक्षक कार्यालय स्तरावर निर्णयाची अपेक्षा..!!


जयदीप जाधव

Uruli Kanchan : उरुळीकांचन : पुणे शहर पोलिस दलात अडीच वर्षापूर्वी सामाविष्ठ होऊन परत शासन निर्णयाने ग्रामीण अधिक्षक कार्यालयात नव्याने सामाविष्ठ झालेल्या व गेली चौदा महिने शासन निर्णय होऊनही अस्थापणा सुरू होण्याचा दिर्घ प्रतिक्षेत राहिलेल्या उरुळीकांचन या नव्या ग्रामीण पोलिस ठाण्याचे पुढील आठवड्यात उद्घाटन करण्यासाठी ग्रामीण अधिक्षक कार्यालय हे प्रयत्न करीत आहे.

पोलिस ठाणे निर्मितीची सर्व तयारी होऊनही उद्घाटक कोन? अशा संपूर्ण पेचात ग्रामीण अधिक्षक कार्यालय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पेचात पोलिस अधिक्षक कार्यालयाने यापूर्वी मोठा कालावधी घालविल्याने अस्थापणा बदलण्याची तात्काळ आवश्यकता लक्षात घेता पोलिस ठाणे हा एखाद्या सिनेमाचा सिक्वेल ठरु नये अशी माफक अपेक्षा होऊ लागली आहे.

अडीच वर्षांपूर्वी पूर्व हवेली तालुक्यातील लोणीकाळभोर व लोणीकंद या पोलिस ठाण्यांचा सामावेश पुणे शहर आयुक्त कार्यालयात करण्यात आला होता. लोणीकाळभोर पोलिस ठाण्या तील उरुळीकांचन पोलिस दूरक्षेत्र, थेऊर पोलिस दूरक्षेत्र तसेच उरुळीदेवाची दूरक्षेत्रातील संपूर्ण २१ गावांचा सामावेश शहर हद्दीत करण्यात आला होता. शहर हद्दीचा नियमावली डावलून २५ किलोमीटर पेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेला विस्तीर्ण भाग या कार्यक्षेत्रात कायम होता. Uruli Kanchan

कर्मचारी संख्या अपुरीच फक्त अधिकारी अधिक अशी अस्थापणा मिळूनही लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचा पूर्वीचा गुन्हेगारी आलेख कमी होईल अशी अपेक्षा होती.मात्र फार काही परिणामकारक चित्र जनतेला दिसेल अशी काही परिस्थिती पहायला मिळाली नाही. गुन्हेगार कायद्याला भिक घालत नाही, गुन्हेगारी पाळेमुळे नष्ट होत नाही, उदयमुखांचा बंदोबस्त होत नाही, अवैध धंद्यांना प्रतिबंध नाही, वाहतूक पोलिस अतिरिक्त असतानाही वाहतुक कोंडीवर जुजबी कारवाई ,चोऱ्यांची घटना कागदावर परंतु वसुलीचा मात्र जोर अशा पध्दतीचा शहरी कारभार जनतेना पाहिला होता.

अडीच वर्षात उरुळीकांचन दूरक्षेत्रात ५ कर्मचारी संख्या पलिकडे उरुळीकांचन पोलिस दूरक्षेत्राला काही मिळाले नसल्याने बदल काय झाला म्हणून जनतेला आजही संशोधनाचा प्रश्न आहे. परंतु आता राज्य शासनाने उरुळीकांचन या ग्रामीण अधिक्षक कार्यालया अंतर्गत नवीन स्वतंत्र पोलिस ठाण्याची मंजुरी दिली आहे.

एक प्रभारी अधिकारी, अतिरीक्त पोलिस निरीक्षक, चार सहाय्यक निरीक्षक, पाच उपनिरीक्षक मिळून शंभर कर्मचारी या नव्या पोलिस ठाण्याला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गेली चौदा महिने मंजुरी मिळुन अद्याप प्रतिक्षेत असलेल्या उरुळीकांचन या नवीन पोलिस ठाण्याची उद्घाटनाची औपचारिकता शिल्लक आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयाने ‘ना घर का ना घाट’ म्हणून आधांतरीत राहिलेल्या या हद्दीला तातडीने सामाविष्ठ करुन घेणे गरजेचे बनले आहे.

बेफाम झालेल्यांना शिस्त लावणे गरजेचं ?

उरुळी कांचन परिसरासाठी स्वतंत्र ग्रामीण पोलिस ठाणे मंजुर झाले तरी या ठिकाणी कडक शिस्तीचा अधिकारी नेमणे जरुरीचे आहे. या ठिकाणी उदयोमुखांचा उच्छाद, गुन्हेगारांची छत्रछायेचा प्रभाव, दादागिरीचा उन्माद, बेशिस्त वाहन चालविण्याचा रुबाब, शाळकरी मुलींना त्रास अशी बेफाम प्रवृत्ती वाढली आहे. पैशाचा जिवावर सर्व काही जिरवण्याची बनलेली मानसिकता तसेच या अवैध गावठी शस्त्रांंचा वावर या ठिकाणी मोडून काढण्याची जबाबदारी पेलावी लागणार आहे.

खमके अधिकारी नेमण्याची अपेक्षा..!

उरुळीकांचन परिसराचा पूर्व इतिहास पाहता या ठिकाणी गुन्हेगारीचा संपूर्ण सुफडा करण्याची अपेक्षा नागरीकांची आहे. या ठिकाणी अनेक कठोर अधिकाऱ्यांनी या ठिकाणच्या गुन्हेगारी कारणाऱ्यांचा बंदोबस्त केला आहे. नुकताच ग्रामीण अधीक्षक अंकित गोयल यांनी शंकर पाटील यांचा नियुक्ती आदेश काढला आहे. त्यांनी यापूर्वी मुंबई, फलटण व भोर पोलिस ठाण्याप्रमाचे कर्तव्याची चुणुक दाखवावी अशी अपेक्षा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!