Uruli Kanchan : उरुळी कांचन येथे हॉटेल मालकाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल….
Uruli Kanchan : उरुळी कांचन (ता. हेवली) येथे एका हॉटेल मालकाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (ता.१२) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी संदेष रंगनाथ जाधव (वय.२४ वर्शे रा.गुरूदत्त हाॅटेल खेडेकर मळा उरूळी कांचन ता. हवेली. जि. पुणे व्यवसाय हाॅटेल) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार माणिक अंगद घाडगे व त्याची पत्नी निकीता मणिक घाडगे (रा.गुरूदत्त अपार्टमेंन्ट खेडेकर मळा उरूळी कांचन ता. हवेली. जि. पुणे) अनिकेत कदम व इतर तीन अनोळखी युवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी संदेष जाधव हे बुधवारी (ता.१२) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घरातील साहित्य महिंद्रा जितो गाडीत भरत असताना तेथे माणिक अंगद घाडगे व त्याच्या सोबत त्याचे चार मित्र आले माणिक घाडगे यांनी त्याच्या जवळ येउन त्यांचा गळा दाबत मागे ढकलले व त्यांच्या हातात असलेल्या लोखंडी पाईपने मारहाण केली.
त्यानंतर त्यांचा मित्र अनिकेत कदम यांने त्यांच्या हातातील फायबर चा दांडा फिर्यादी यांच्या डोक्यात मारला व दुस-या दांडयाचा मारहाण करून पाठीवर मारला. तसेच माणिक यांनी लोखंडी पाईप पुन्हा फिर्यादी यांच्या डोक्यात मारला व अनिकेतने डोक्यात पुन्हा फायबर दांडा मारला. Uruli Kanchan
त्यामुळे फिर्यादी यांना चक्कर आली. त्यानंतर ते खाली बसलो तेवढयात त्याच्या इतर तीन मित्रांनी लाथा बुक्यानी मारहाण केली. फिर्यादी गणराज हाॅस्पिटल येथील अपघात विभागात उपचार सुरु असून याप्रकणी अंगद घाडगे व त्याची पत्नी निकीता मणिक घाडगे, अनिकेत कदम व इतर तीन अनोळखी युवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.