Uruli Kanchan : उरुळी कांचनमध्ये मुलींची बाजी! डॉ. अस्मिता माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के…


Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील अजिंक्य चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला आहे. अशी माहिती संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली आहे.

महाविद्यालयातून एकूण १५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील १५६ पैकी १५६ विद्यार्थी पास झाले आहेत. तर अस्मिता विद्यालय या केंद्रात एकूण ३७६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यातील सर्वच्या सर्व ३७६ विद्यार्थी पास झाले आहेत.

विद्यालयात प्रथम चार आलेले विध्यार्थी..

सुमित दीपक भालेराव ९३.०० टक्के
श्रावणी अमोल टिळेकर ८९.१७ टक्के
दिया दीपक गोंडचर ८३.५० टक्के
पाटील संतोष बगाडे ८९.१७ टक्के.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उरुळी कांचनसह परिसरातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन, सचिव डॉ. अप्पासाहेब जगदाळे, प्रभाणे सर, संपूर्ण स्टाफ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून संस्थेचा निकाल १०० टक्के आहे. संस्थेची नेत्रदीपक प्रगती यापुढेही सुरूच राहणार आहे. आपले जीवन बलशाही बनवायचे असेल तर कष्ट, चिकाटी, जिद्द याशिवाय यशाला पर्याय नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!