Uruli Kanchan : लॅन्ड माफिया बापू शितोळे सह पाच जणांना पोलिस कोठडी! घरातून तब्बल १६० काडतुसे हस्तगत…


Uruli Kanchan उरुळीकांचन : रिंगरोड जमीनीत गुंतवणूक केलेल्या पैशाच्या वादातून जमीन दोघांवर पिस्तुलातून गोळीबार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी लॅन्ड माफिया दशरथ उर्फ बापू शितोळे याच्यासह इतर पाच जणांना १८ सष्टेंबर पर्यंत ३ दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एन.बी.बारी यांनी दिले आहेत.

रिंगरोड मधील बाधित शेतकऱ्यांच्या जमीन खरेदी व्यवहारातून शेतकऱ्याचे पैसे न दिल्याने झालेल्या वादातून बापू शितोळे याने काळुराम महादेव गोते (रा.बिवरी, ता.हवेली ) व शरद कौलास गौते (रा.बिवरी , ता.हवेली ) या दोघांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्यात काळुराम गोते हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवार (दि.१४) रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला असताना आरोपी बापू शितोळेला पोलिसांनी इनामदारवस्ती परिसरातून अटक केली आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी बापूची पत्नी निलिमा दशरथ शितोळे , बहिण आशा सुरेश भोसले, मुलगा जिग्नेश दशरथ शितोळे , भाचा अक्षय सुरेश भोसले व निखिल सुरेश भोसले या इतरांना रात्री उशिरा अटक केली आहे.

बापू शितोळे यांना गोळीबार करताना कुटूंबातील इतर सदस्यांनी त्यांना जिवे मारण्यासाठी प्रोत्साहित करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान सर्व आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.बी.बारी यांच्यापुढे हजर केले असताना न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुणावणी आहे. या हल्ल्या प्रकरणामागे रिंगरोड बाधीत शेतकऱ्यांच्या जमीनींचे भूसंपादन पूर्वी व्यवहार करुन मोबादला स्विकारल्याचा शक्यता आहे. Uruli Kanchan

या प्रकरणाबरोबर आणखी किती प्रकरणे बापू शितोळेशी संबंधित आ हेम्हणून पोलिस तपास करणार आहे. त्यामुळे शितोळेशी गुंतवणूक असणारे बडे धेंड्यांत इतर तपास एजन्सीचा ससेमिरा लागतोय काय अशी चर्चा हवेलीत रंगली असून हवेलीत तीन बडे उद्योजक, एक सहकार क्षेत्रातला राजकारणी तसेच बडे अधिकारी यांची मोठी माया अडकल्याच्या चर्चा नातेवाईकांत सुरू आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!