Uruli kanchan : उरुळीकांचन पोलिस ठाण्यात पहिल्या सकाळीच गुन्ह्याची भवानी, सोरतापवाडीत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल ..!!

Uruli kanchan उरुळीकांचन : पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत प्लॅस्टिक कचरा घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकाच्या निष्काळजीपणाने ट्रक पुलाखाली कोसळुन झालेल्या अपघातप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्ह्या उरुळीकांचन पोलिस ठाण्याचा पहिला गुन्हा ठरला आहे.

फारुकी इब्राहिम सय्यद (रा.हाऊस नं.३६० न्यु ऐरीया नबाब वस्ती, टेमघर, भिवंडी ठाणे ) असे या गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ८वा. सुमारास आठ वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत पेठ फाटा प्लॅस्टिक कचरा भरलेला ( ट्रक नं. एम एच १३ ए एक्स ४८६४ ) हा चालकाच्या निष्काळजीपणाने अपघात घडून पुलाखाली पडला.

प्रथमदर्शनी पाहणीत हा ट्रक वाहतुक नियामांकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभूत ठरल्याने ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोटार वाहतुक कायद्याअंतर्गत भा.द.वि.२१९, ३३७, ४१७ तसेच मोटर वाहतुक कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. Uruli kanchan
दरम्यान उरुळीकांचन पोलिस ठाण्यात चालकाच्या वाहतुक नियम न पाळण्याचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. वाहतुक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या संजय सखाराम कसबे (वय ४४ व्यवसाय – चालक रा. खामगाव फाटा ता.दौड जि.पुणे) असे गुन्हा दाखल होणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक कोंडीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिस निरीक्षण शंकर पाटील यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान उरुळीकांचन या नवीन ग्रामीण पोलिस ठाण्याची अस्थापणा रविवारी रात्री १२ पासून सुरु झाली आहे.