Uruli Kanchan : घराचा दरवाजा तोडून तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल लंपास, उरुळी कांचन येथील घटना…
Uruli Kanchan : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घराचा दरवाजा तोडून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच ५० हजार रोख रक्कम, सोन्या- चांदीचे दागिने असा २ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला आहे.
ही घटना उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर, बायफ रोड, उरुळी कांचन येथे मध्यरात्री घडली आहे. स्वप्नील बाळासाहेब कांचन (वय- ३०, रा. लक्ष्मीनगर, बायफ रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्या घरी ही चोरी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील कांचन हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी घरामध्ये असलेल्या त्यांची आई एका खोलीला कुलूप लावून दुसऱ्या खोलीत झोपली होती. Uruli Kanchan
मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले…
मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व सोन्या- चांदीचे दागिने घेऊन पळ काढला. दरम्यान, सदर ठिकाणी उरुळी कांचनचे पोलीस दाखल झाले असून घटनेची चौकशी करून पंचनामा सुरु करण्यात आला आहे. तसेच या परिसरात भीतीचे वातावरण आहे.