Uruli Kanchan : धनदांडग्या प्लॉटींग व्यावसायिकाने खडकवासला नवीन मुठा कालव्याची पोटचारी पाईप टाकुन बुजविली! खडकवासला जलसंपदा विभागाची आळमिळी गपगिळी कारभार स्थानिकांच्या मुळावर..!!


Uruli Kanchan उरुळीकांचन : खडकवासला नवीन मुठा कालव्याच्या शेती सिंचनासाठी असणाऱ्या पोटचाऱ्या अनधिकृत प्लॉटींग व्यवसायासाठी बंदिस्त पाईप टाकून भराव घालून बुजण्याचा प्रकार उरुळीकांचन येथील बाएफ रस्त्यावर सुरू असून उरुळीकांचन ग्रामस्थांनी जलसंपदा विभागाच्या स्थानिक शाखा अभियंता कार्यालय, उप -कार्यकारी अभियंता कार्यालय यांच्याकडे तक्रार करुनही खडकवासला जलसंपदा विभाग स्थानिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली आहे. धनदांडग्या प्लॉटींग माफिया विरुद्ध कारवाई करण्यासाठी खडकवासला विभागाने आंधळेपणाचे सोंग घेतले असल्याने परिसरात शेतकऱ्यांच्या शेतीवर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे.

खडकवासला नवीन मुठा कालव्याच्या पोटचारी फाटा क्र.५० वरील प्लॉटींग व्यवसायिकाकडून पोटचारी बंदिश पाईप टाकून बुजविण्याचा प्रकार चालू आहे. साधारण ४०० फूटावरील अंतर रस्त्याच्या दर्शनी भागाला जोडून प्लॉटींग क्षेत्र विक्रीसाठी चांगला भाव मिळावा म्हणून पोटचारी अनधिकृतपणे बंदिस्त पाईप टाकून बुजविण्याचा प्रकार झाला आहे. सदर प्रकार गेली महिना भर सर्रासपणे सुरू असून तक्रार करुन देखील स्थानिक विभाग हा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याने या पोटचारीवर अवलंबून असलेल्या शेती व कुपनलिकांचे पाण्याचे स्त्रोत बंद पडून शेती उजाड होण्याची वेळ उद्भवली आहे.

खडकवासला कालव्यातील या पोटचारीतून उरुळीकांचन, टिळेकरवाडी, खामगाटेक या परिसरातील शेतीला या पोटचारीतून पाणी मिळत आहे. या परिसरात विहीरी, बोअरवेल व सिंचनाचे या पोटचारीतून पाण्याचे मोठे स्त्रोत आहे. अशावेळी प्लॉटींग व्यवसायिकाने स्वतःच्या फायद्यासाठी पोटचारी बंदिस्त पाईप टाकून बुजविण्याचा प्रकार केला आहे.

सदर प्रकार सुरू असताना स्थानिक नागरीक व शेतकऱ्यांनी उरुळीकांचन पाटबंधारे विभाग व यवत पाटबंधारे उपविभाग यांना तक्रार तसेच लेखी अर्ज देऊन बंदिस्त पाईप टाकून पोटचारीच बुजविण्याचा गंभीर प्रकार होताना डोळेझाक केली आहे. या संपूर्ण प्रकाराने धनदांडग्यांनी प्रशासनच आपल्या तालावर नाचविण्याचा प्रकार केला असून खडकवासला जलसंपदा विभागाने कारवाई सोडाच पण प्रतिबंध घालण्यासाठी गुडगे टेकल्याची परिस्थिती आहे. या प्रकाराबाबत उरुळीकांचन पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता अर्चना जगताप यांच्या शी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ‘

खडकवासला पोटचारीवर शेती व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अवलंबून आहे. बंदिस्त पाईप टाकल्याने हे स्त्रोत्रच नष्ट होण्याचा धोका आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुन देखील स्थानिक जलसंपदा विभाग फौजदारी कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने प्लॉटींग व्यवसायिकाने निर्धास्तपणे कायदे मोडीत हे काम पूर्ण केले आहे”

-मयूर कांचन, सदस्य ग्रामपंचायत उरुळीकांचन.

 

” खडकवासला पोटचारी बंदिस्त पाईप टाकून बुजण्याचा प्रकाराची माहिती घेण्यात येईल, तसेच संबंधित प्रकार घडल्यास कारवाई करण्यात येईल. स्थानिक विभागाला कारवाईचा सूचना देणार आहे.”

– श्वेता कुऱ्हाडे , कार्यकारी अभियंता खडकवासला जलसंपदा विभाग.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!