Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील ज्योतिबा फ्लेक्स प्रिंटिंगचे मालक दत्ता तुपे यांचे अपघातात निधन…
Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील ज्योतिबा फ्लेक्स व प्रिंटिंगचे मालक दत्तात्रय ग्येनबा तुपे (वय.६१) यांचे सोमवारी रात्री अपघाती निधन झाले आहे. सोमवारी (ता. २७) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय तुपे हे फ्लेक्सच्या दुकानात दुचाकीवरून निघाले होते.
यावेळी दुकानाकडे जात असताना वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीने तुपे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. दरम्यान, या धकडकेत तुपे हे जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचरादारम्यान त्यांचा मृत्यू झाला. Uruli Kanchan
हॉटेल व्यावसायिक व सामाजीक कार्यकर्ते आशुतोष तुपे यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. २७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठे संख्येने मान्यवर उपस्थित होते.
Views:
[jp_post_view]