Uruli Kanchan : कंटेनरची हायवाला जोरदार धडक, उरुळी कांचन येथे अपघात, कोणतीही जीवित हानी नाही..
Uruli Kanchan उरुळी कांचन : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक घटना पुणे – सोलापूर महामार्गावरन समोर आली आहे.
या महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा परिसरात दुभाजकावरून वळण घेत असलेल्या हायवाला कंटेनरने जोरात धडक दिल्याची घटना घडली आहे. हा अपघात शनिवारी (ता. ०८) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, पुणे – सोलापूर महामार्गावरून हायवा हा सोलापूरच्या दिशेने निघाला होता. यावेळी तो खेडेकर मळा परिसरात पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडे दुभाजकावरून वळण घेण्यासाठी थांबला होता. Uruli Kanchan
त्यावेळी सोलापूरच्या बाजूने निघालेल्या कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्याने थेट हायवाला जाऊन धडक दिली. यावेळी परिसरात मोठा आवाज झाल्याने अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
कोणतीही जीवित हानी नाही…
तसेच अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.