Uruli Kanchan : जिल्ह्यात ‘स्वभाव स्वच्छता व संक्कार’ या अभियानाचा शुभारंभ! उरुळी कांचन येथून जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी स्वच्छता करुन केली अभियानाला सुरुवात…
Uruli Kanchan उरुळी कांचन : आपल्या गावची व परिसराची स्वच्छता करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. नागरीकांंनी स्वच्छतेची कर्तव्यता पार पडली तर स्वच्छतेच्या प्रश्नावर आपण मात करु शकतो. शासन स्वच्छतेच्या बाबत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देत आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी निधीच्या खर्चाबाबत नियोजन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या स्वच्छता ही सेवा २०२४ या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यात’स्वभाव स्वच्छता व संक्कार’ या अभियानानुसार १८ सष्टेंबर ते २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती ) निमित्त आयोजित अभियानाचा शुभारंभ उरुळीकांचन (ता.हवेली ) येथून पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते स्वच्छता अभियात सहभाग घेऊन करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे म्हणाले, स्वच्छता चळवळ ही सामुहिक जबाबदारी आहे. या चळवळीत स्वच्छतेचे देशहिताचे भरीव कार्य होत आहे. विदेशाच्या धर्तीवर आपणही स्वच्छता कार्यात कचरा संकलन , विघटन व प्रक्रिया संदर्भात कार्य करीत आहे. जिल्ह्यास्तरावर जिल्हा नियोजन समितीत स्वच्छतेच्या खर्चावर अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कचरा संकलनासह कचरा निर्मूलनास अधिनुक प्रकल्पाची मदत मिळत आहे. ग्रामपंचायतींनी अशा सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, हवेलीचे गट विकास अधिकारी भूषण जोशी, सरपंच अमितबाबा कांचन , उपसरपंच सिमा कांचन, जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, माजी पंचायत समिती उपसभापती हेमलता बडेकर , माजी सरपंच संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन , राजेंद्र कांचन , अजिंक्य कांचन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते उरुळीकांचन शहरात ग्रामस्वच्छतेचे कार्य करणाऱ्या उरुळीकांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या संतोष चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.