Uruli Kanchan : उरुळीकांचनसह परिसरात अवैद्य धंद्यांवर पोलिसांची मोठी कारवाई! महिलेसह पाच जणांवर उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल..!!


Uruli Kanchan उरुळी कांचन : पुणे अधिक्षक कार्यालयात नव्याने स्थापित झालेल्या उरुळी कांचन पोलिस ठाण्यात २४ तासांत पोलिसांनी हद्दीतील उरुळीकांचन, सोरतापवाडी, नायगाव, पेठ, कोरेगावमूळ परिसरातील अवैध अंद्यांवर मोठी कारवाई केली आहे. त्यानुसार हद्दीतील देशी-विदेशी दारू, मटका धंद्यांवर कारवाई करून सुमारे ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत ६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ग्रामीण भागात अवैद्य धंद्यांवर प्रतिबंध घालणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर उरुळीकांचन या पुणे पोलिस आयुक्तालयातून स्वतंत्र पोलिस ठाणे झालेल्या उरुळीकांचन ग्रामीण पोलिस ठाण्यात मात्र अवैद्य धंदे रासरोसपणे सुरू होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी अवघ्या २४ तासांत अवैध धंद्यांवर हातोडा मारण्यास सुरुवात केली आहे. Uruli Kanchan

त्यानुसार अवैधरित्या मटका चालविल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी रवी अवचट व अक्षय त्रिंबक शिरोळे (वय २७, दोघेही रा. नायगाव, ता. हवेली), दत्ता विठ्ठल कदम (वय ५५, रा. पिराचा मळा, हरीजीवन हॉस्पिटलच्या पाठीमागे, उरूळी कांचन, ता. हवेली) तर बेकायदा देशी, विदेशी दारू विक्री प्रकरणी विठ्ठल दत्तात्रय घाडगे (वय ३०, रा. गिरमेवस्ती, चौधरी माथा, उरूळी कांचन), अशोक नामदेव चौधरी (वय ४३, रा. पेठ, ता. हवेली) व बेबी नारायण चौधरी (वय ३६, रा. उरूळी कांचन, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २०) नायगाव ग्रामपंचायत हद्दीतील दोस्ती हॉटेलच्या बाजूला रवि अवचट, अक्षय शिरोळे व उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शैलेजा हॉटेलच्या आडोशाला दत्ता कदम हा जुगाराची साधने जवळ बाळगून, त्याच्या ओळखीच्या लोकांना जुगार खेळ खेळत व खेळवीत असताना आढळला. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरमे वस्ती परिसरात गुरु हॉटेलच्या आडोशाला विठ्ठल घाडगे, पेठ येथे हॉटेल सूरज वे शेजारी अशोक चौधरी व उरुळी कांचन येथील हॉटेल सोनाईचे शेजारी बेबी चौधरी हे तिघेजण बिगर परवाना अवैद्य देशी विदेशी दारू विक्री करताना आढळून आल्याने त्यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!