Uruli Kanchan : सोरतापवाडी येथील प्रसिद्ध ट्रान्सपोर्ट व्यावसायिक बाळासाहेब चौधरी यांचे निधन..!!

Uruli Kanchan उरुळीकांचन : सोरतापवाडी ( ता.हवेली ) येथील प्रसिद्ध ट्रान्सपोर्ट व्यावसायिक बाळासाहेब मार्तंड चौधरी (वय -७२) यांचे गुरुवार (दि.२३) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.
सोरतापवाडी, नायगाव व पेठ येथील चिंतामणी प्रसारीक दिंडीसाठी त्यांनी नित्य एकादशी व आषाढी वारी साठी वाहन उपलब्ध करुन देण्याची सेवा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. उद्योजक देवेंद्र चौधरी हे त्यांचे चिरंजीव तर सोरतापवाडी ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया चौधरी ह्या त्यांच्या स्नुषा आहेत.
Views:
[jp_post_view]