Uruli Kanchan : कोरेगाव मूळ येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी चिंतामणी कड यांची बिनविरोध निवड..


Uruli Kanchan उरुळी कांचन : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी चिंतामणी कड यांची आज गुरुवार (ता.२१) बिनविरोध निवड करण्यात आली. यामुळे जल्लोष करण्यात आला. सरपंच मंगेश अशोक कानकाटे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.

या निवडणुकीत अश्विनी चिंतामणी कड यांचा एकमेव अर्ज आल्याने  निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी सतिश कालोलकर यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली

निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी सतिश कालेलकर यांनी काम पाहिले. अश्विनी चिंतामणी कड यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांकडून फटाके व गुलालाची उधळून करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी त्यांच्या गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. Uruli Kanchan

यावेळी ग्रामपंचायतीचे उपस्थित सर्व सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच अश्विनी चिंतामणी कड यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच, ग्रामपंचायत असे सर्वजण एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. या कामांसाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!