Uruli Kanchan : उरुळी कांचन येथे ‘तू येथे का आलास’ अशी विचारणा करत तरुणाला लोखंडी कड्याने डोक्यात मारहाण, एकावर गुन्हा दाखल..

Uruli Kanchan : दिवसागणिक गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहेत. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार समोर येत आहे.
सध्या अशीच एक घटना उरुळी कांचन (ता. हवेली) येथून समोर आली आहे. तू येथे का आलास’ या कारणावरून एका व्यक्तीने २७ वर्षीय तरुणाला लोखंडी कड्याने डोक्यात मारहाण केल्याची घटना घडली आहे.
ही घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पीएमटी बस स्टॉपजवळ मंगळवारी (ता. १९) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुहास संजय गिरंजे (वय २७, रा. आश्रमरोड, शिवशंभो सोसायटी, बंगलो नं. २, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय ठवरे (रा. पुरंदर सोसायटी, उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या पाठीमागे, उरुळी कांचन, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, , मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुहास गिरंजे हे उरुळी कांचन येथील गावच्या हद्दीतील पीएमटी बस स्टॉपजवळून निघाले होते. या वेळी त्यांचा मुलगा अजय ठवरे व त्याच्यासोबत असलेला सुहास यांचा मित्र सुमित लिंबोने याने हाक मारली. Uruli Kanchan
सुहास हे त्याठिकाणी गेले असता अजय ठवरे याने ‘तू येथे का आलास’ या कारणावरुन शिवीगाळ, दमदाटी करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी त्याने हातातील लोखंडी कड्याने डाव्या कानाच्या वरती डोक्यात मारहाण केली.
दरम्यान, या प्रकरणी सुहास गिरंजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजय ठवरे याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.