Uruli Kanchan : उरुळी कांचन येथे पुणे- सोलापूर महामार्गावर किरकोळ कारणावरुन चौघांमध्ये तुफान हाणामारी, गुन्हा दाखल…

Uruli Kanchan : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वाढले आहे.

उरुळी कांचन येथून देखील सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. पुणे- सोलापूर महामार्गाच्या बाजुला किरकोळ कारणावरून आपआपसात शिवीगाळ, भांडणे करून एकमेकांना दगडाने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी चौघांवर आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २४) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली होती.

रविंद्र प्रभाकर काळे, वय.३०, रा. तांबेवस्ती, उरुळी कांचन, गणेश मायप्पा कांबळे, वय.३० रा. दातार कॉलनी, उरूळी कांचन), रवि मल्लिकार्जुन पोतेकर, (वय- ३०, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन) महादू दिलीप मंजूळे, (वय.२७, रा. शिवार हॉटेलजवळ, उरुळी कांचन, मूळ रा. उमरगा, ता. जि. उमरगा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई धनंजय अनिल भोसले यांनी फिर्याद दिली आहे. Uruli Kanchan
मिळालेल्या माहिती नुसार, मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हॉटेल जगदंबाच्या समोर सार्वजनिक ठिकाणी रविंद्र काळे, गणेश कांबळे, रवि पोतेकर, महादू मंजुळे हे किरकोळ कारणावरून भांडणे करीत होते.
यावेळी किरकोळ बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत होऊन एकमेकांशी पुणे – सोलापूर महामार्गाच्या बाजूला भांडणे करीत हाताने मारहाण करून व शिवीगाळ दमदाटी केली.
आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी चौघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
