Uruli Kanchan : उरुळी कांचन परिसरात चोरीचे सत्र सुरूच, भरदिवसा ८ तोळे सोन्याचे दागिने केले लंपास…

Uruli Kanchan : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोड परिसरात एका घरातून भर दिवसा आठ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे सत्र सुरूच असून नागरिकांमध्ये भीतीचे वातारावण आहे.
यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच उरुळी कांचन पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तसेच उरुळी कांचन परिसरात घरफोड्या, अन्य किरकोळ चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. Uruli Kanchan
दरम्यान, वाढत्या गुन्हेगारीने नागरिक हैराण झाले आहेत. भरदिवसा लुटमार सुरु झाल्याचे प्रकार दिवसागणिक वाढत चालले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे
Views:
[jp_post_view]