Uruli Kanchan : उरुळीकांचन जवळील गावात मुख्याध्यापकाने संस्था चालकांना डावलून परस्पर शिक्षक मान्यता प्रस्ताव केले मंजूर! शिक्षक चौकशी अहवालात मुख्याध्यापकाचे कारनामे उघड…!!


Uruli Kanchan उरुळी कांचन : शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शाळेत शासनाच्या निधीचा उपहार केल्याप्रकरणी चौकशी अहवाला अंतर्गत उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील एका मुख्याध्यापकपदावर शिक्षण विभागाच्या चौकशीअंती ठपका ठेवला आहे. या मुख्याध्यापकाने विद्यालयात पूर्व अधिसूचित पद मान्यता डावलून वैयक्तिक फायदेसाठी भरती प्रक्रिया डावलून शिक्षकांची भरती करुन शासन मान्यता मिळविल्याचा ठपका ठेवण्यात आला असून भरती प्रक्रीयेतील कारवाई कसून केल्याबद्दल कारवाईची शिफारस शिक्षण उपसंचालक,पुणे विभाग पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे.

उरुळीकांचन जवळील गावातील हे माध्यमिक विद्यालय ५ वी ते १० वी शिक्षणाची सोय असलेली मराठी माध्यमाची शाळा आहे. यापैकी ५ वी ते ७ वीचे वर्ग विनाअनुदानीत असुन ८ वी ते १० वीचे वर्ग अनुदान पात्र आहेत. या शाळेत ५ वी ते ८ वी च्या वर्गांना शिकवण्यासाठी शाळा चालक संस्थेकडे अगोदरच घेतलेले चार शिक्षक आहेत, त्यांच्या पदांना मान्यता मिळण्यासाठी लागणारा ठराव व प्रस्ताव संस्था पातळीवर पूर्वीच करण्यात आला होता.

पण मुख्याध्यापक हेच संस्थेचे सचिव असल्याने त्यांनी स्वतः हा प्रस्तावात फेरफार करुन क्लार्कच्या सहाय्याने, संस्थेच्या इतर पदाधिकारी अथवा सदस्यांना विश्वासात न घेता, या चौघां व्यतिरिक्त आणखी दोन शिक्षकांचा ठराव व प्रस्ताव, संस्था चालकांकडून न घेता परस्पर फक्त प्रस्तावात बदल करून, शिक्षणाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे पाठवून, तो मंजूर करून घेत फक्त त्या दोन शिक्षकांना, सरळ अनुदानावर कामावर रुजू करून घेत हा गैर प्रकार केला असल्याची माहिती संस्थेने शिक्षणाधिकारी ,पुणे जिल्हा परिषद पुणे, माध्यमिक विभागाच्या पत्र जा.क्र.६४०४/ २०२२. दि.२४/०८/२०२२ नुसार खुलासा मागणी पत्राला उत्तर देताना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

जे शिक्षक या शाळेत पूर्व अधिसूचित २००९ पासून पदाच्या मान्यतेसाठी वाट बघत होते, त्यांना डावलून हे दोन प्रस्ताव मुख्याध्यापक यांनी मंजूर करुन घेतले आहे. तर २००९ चार शिक्षक मान्यतेच्या प्रतिक्षेत होते. त्यांना या ठिकाणी डावलून दोघांना मान्यता देण्याचा प्रकार या विद्यालयात झाला आहे. मान्यता प्रतिक्षेत असलेल्या चौघा शिक्षकांनी २०१६ नंतर ही आपल्या पदाला मान्यता का मिळत नाही? या शंकेतून माहितीच्या अधिकारात माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्यानंतर, हा प्रकार उघडकीस आला आहे. या जून्या शिक्षकांना बाजूला ठेवत व आर्थिक सलगी करत आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद पुणे यांच्या सहयोगा शिवाय हा गैरप्रकार होऊच शकत नाही अशी पुष्टी शिक्षण क्षेत्रातील जाणकार बोलून दाखवत आहेत.Uruli Kanchan

आता विद्यमान शिक्षण उपसंचालक पुणे विभाग हे विद्यमान शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्या शिफारसीनुसार नेमका काय व कधी निर्णय घेणार? या पदांना मान्यता आहे असे आदेश मिळवत, त्या पदावर हजर होत आजपर्यंत कार्यरत राहून, पगार घेत शासनाची फसवणूक केल्याच्या कारणावरून त्या दोन शिक्षकांवर नेमकी काय कारवाई करणार याकडे पूर्व हवेलीचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!