तातडीने नेत्यांना फोन ; भाजपच्या कोणत्या नेत्यांनी भरला उमेदवारीचा अर्ज? पुण्यातील यादी आली समोर

पुणे : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यात स्वबळावर लढणाराऱ्या भाजपने आज कार्यालयातून तातडीने नेत्यांना फोन करत उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलं. त्यानंतर उमेदवारांनी तात्काळ अर्ज भरले.

भाजपच्या कोणत्या नेत्यांनी अर्ज भरला?

गणेश बिडकर, निवडणूक प्रमुख, पुणे शहर भाजप

सुशील मेंगडे, नगरसेवक
सचिन दोडके, नगरसेवक
रेश्मा बराटे
राघवेंद्र मानकर
कल्पना बहिरट
देवेंद्र उर्फ छोटू वडके
उज्वला गणेश यादव
प्राजक्ता गडाळे
शंतनू कांबळे
सुजाता काकडे
सायली वांजळे, नगरसेविका
रूपाली धाडवे, नगरसेविका
विशाल धनवडे, नगरसेवक
पल्लवी जावळे, नगरसेवक
महेश वाबळे, नगरसेवक
श्रीनाथ भिमाले, नगरसेवक
राजेंद्र शिळीमकर, नगरसेवक
योगेश मुळीक, नगरसेवक
अर्चना पाटील, नगरसेविका
वर्षा तापकीर, नगरसेविका
उज्वला जंगले, नगरसेविका
रंजना टिळेकर, नगरसेविका
किरण दगडे, नगरसेवक
बाळा ओसवाल, नगरसेवक
वर्षा साठे, नगरसेविका
अल्पना वरपे, नगरसेविका
वर्षा साठे, नगरसेविका
दिलीप वेडे पाटील, नगरसेवक
राणी भोसले, नगरसेविका
कलिंदा पुंडे: नगरसेविका
राजाभाऊ बराटे, नगरसेवक
प्रसन्न जगताप, नगरसेवक
अजय खेडेकर, नगरसेवक
मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका
पृथ्वीराज सुतार, नगरसेवक
उमेश गायकवाड, नगरसेवक
कुणाल टिळक (दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे सुपुत्र)
स्वरदा बापट (दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून)
अपूर्व खाडे
या आगामी निवडणुकीसाठी फोन येताच भाजपच्या उमेदवारांनी आज थेट क्षेत्रीय कार्यालय गाठलं. त्यानंतर भाजप उमेदवारांकडून अर्ज भरण्यासाठी घाई केली. विलंब न लावता भाजपच्या माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज भरला. ना मोठा गाजावाजा, ना सोबतीला मोठे नेते घेत भाजपच्या उमेदवारांनी अर्ज भरला. दरम्यान या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
