UPI Payment करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, दोन दिवस सेवा राहणार बंद, जाणून घ्या….

UPI Payment : तुम्ही UPI पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आजच तुम्ही पैसे काढून आणा. नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं. याचं कारण म्हणजे दोन दिवस upi payment बंद राहणार आहे.

तसेच तुम्ही या दोन दिवसांत या निर्धारित वेळेत कोणताही UPI व्यवहार करण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ लक्षात ठेवा. तुमच्याकडे थोडे पैसे ठेवा नाहीतर कुठे पेमेंट करताना न झाल्यास अडचणी येऊ शकता. बँकेनं ग्राहकांना आधीच SMS पाठवून याची माहिती दिली आहे.


तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल किंवा त्या बँकेचा सर्व्हर वापरून पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आज तुम्ही स्वत: कडे थोडे पैसे ठेवा नाहीतर पेमेंट झालं नाही तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. UPI Payment
या महिन्यात दोन दिवस यूपीआयवरुन कोणतंही ट्रान्झेक्शन करता येणार नाहीत. ५ नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर हे दोन दिवस ग्राहकांना UPI पेमेंट करताना अडचण होणार आहे.सिस्टिम मेंटेनन्ससाठी UPI सेवा बंद राहणार असल्याची माहिती बँकेनं दिली आहे. ५ नोव्हेंबर रोजी रात्री १२ ते २ वाजेपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे.
