घरबसल्या फ्री मध्ये करा आधार कार्ड अपडेट, ‘या’ तारखेपर्यंत आहे शेवटची संधी


पुणे : आधार कार्ड मध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी आधार कार्ड अपडेट करावे लागते. हे आधार कार्ड १५ जून पर्यंतच घरबसल्या अपडेट केले जाईल. त्यानंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दर आकारले जातील. याविषयी UIDAI माहिती दिली आहे.

तसेच आधार कार्ड ऑफलाईन अपडेट करण्यासाठी महाई-सेवा केंद्रामध्ये (पन्नास रुपये शुल्क घेण्यात येते.१५ जूनपूर्वी आधार कार्ड अपडेट करणाऱ्या नागरिकांकडून पैसे वसूल केले जाणार नाही.

अशा प्रकारे करा आधार कार्ड अपडेट

UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन त्यावर तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा. आधार कार्ड मधील जे दुरुस्ती करायची असेल त्यावर क्लिक करून अचूक माहिती भरा. माहितीची पडताळणी करण्यासाठी पॅन कार्ड , मतदान कार्ड अशा साहय्यक कागदपत्राची जोडणी करा. त्यानंतर सर्व माहिती ऑनलाईन अपडेट होईल.

आवश्यक तेथे माहिती इंग्रजी किंवा मराठी भाषेमध्ये भरावी. आधार कार्ड दुरुस्त करत असताना URN सुरक्षित आहे का याची खात्री करून घ्यावी. जर आधार कार्ड धारकाकडे मोबाईल नंबर नसेल तर, आधार कार्ड दुरुस्ती करण्यासाठी ऑफलाइन पर्यायाचा वापर करा.

ही कागदपत्रे लागणार

लग्नानंतर काही व्यक्तींना नावामध्ये दुरुस्ती करावी लागते. परंतु त्यासाठी महत्त्वपूर्ण कागदपत्रे देखील लागतात. पासपोर्ट, पॅन कार्ड, रेशन कार्ड, वोटर आईडी या महत्वपूर्ण कागदपत्रे आधार कार्ड अपडेटसाठी समावेश असावा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!