UP News : नववधू गुटखा खाते म्हणून सासरचे संतापले, गाठले थेट पोलीस स्टेशन अन्…


UP News : गुटाख्‍याच्‍या व्यसनामुळे नववधूचा संसार माेडण्‍याची वेळ आल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. आग्रा येथील कुटुंब समुपदेशन केंद्रात एक विचित्र प्रकरण पोहोचले. सुनेला गुटखा खाण्याच्या व्यसनामुळे लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, छट्टा येथे राहणाऱ्या एका तरुणीचा शहागंज येथे राहणाऱ्या तरुणाशी नुकताच विवाह झाला. लग्‍नानंतर तिला गुटखा खाण्‍याचे व्‍यसन असल्‍याची माहिती सासर्‍याच्‍या मंडळींना झाली.

पतीसह घरातील सर्वजण सुनेला गुटखा खाऊ नको म्हणून समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण तिने कोणाचेही ऐकले नाही. चोरून गुटखा खाणे तिने सुरुच ठेवले. इकडे-तिकडे थुंकताना तिला सासरच्या मंडळींनी पकडले.

या प्रकारावरुन तिचा पतीसह सासरच्या मंडळींसाोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेला अन् पतीने तिला माहेरी पाठवले. यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यापासून कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहचले.

समुपदेशक काय म्हणाले ?

दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात कुटुंब समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉ.अमित गौर यांनी सांगितले की, “कुटुंबातील एका महिलेने गुटखा खाल्ल्याने लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे. UP News

पत्नीने गुटखा खाणे बंद करावे, असे पतीला वाटते; पण पत्नीचे गुटखा खाण्‍याचे व्‍यसन सुटत नाही. सध्या समुपदेशकांच्या स्पष्टीकरणानंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. या जोडप्याला पुढील तारीख देण्यात आली आहे.

दरम्यान, पत्नी सकाळी उठल्याबरोबर घरातील कामे करताना पदराआडून गुटखा खाते आणि इकडे तिकडे थुंकते. घरच्यांनी अनेकदा विरोध केला, समजावूनही सांगितले. पण ती ऐकत नाही. वैतागून मी पत्नीला सोडले. ज्यावरून ती आता माझ्यावर खोटे आरोप करत आहे, असा दावा पतीने केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!