UP Government : योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का, नेमप्लेट संदर्भातील निर्णयाला स्थगिती, नेमकं प्रकरण काय?


 UP Governmen : उत्तर प्रदेशमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात होताच कावड यात्रेला सुरुवात होते, त्यानुसार आज २२ जुलैपासून ही कावड यात्रा सुरु झाली आहे. मात्र, युपीमधील ही कावड यात्रा सध्या या ना त्या गोष्टींमुळे चांगलीच चर्चेत असून वादग्रस्त ठरत आहे.

कावड यात्रा मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर मालकाचे नाव लिहिणे बंधनकारक असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.

कावड यात्रेतील मार्गावर असलेल्या दुकानांवरील नेमप्लेटसंदर्भाने सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, योगी सरकारने खाद्यपदार्थ व दुकानदारांच्या नावासंदर्भातील निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयाला राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनीही कडाडून विरोध केला होता. UP Governmen

उत्तर प्रदेश सरकारने कावड मार्गवर पावित्र्य जपण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार, खाद्यपदार्थांच्या प्रत्येक दुकान व हातगाड्यांवर संबंधित मालकाचे नाव सांगणारा बोर्ड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. कावड यात्रेत सहभागी झालेल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

या शासन निर्णयानंतर उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक रेस्टॉरंट, भोजनालय, रस्त्याच्या बाजूचे ढाबे, फूड स्टॉल अशा प्रत्येकांनाच मालकाच्या नावाचा बोर्ड लावण्यास सुरुवातही झाली होती. मात्र, काहींनी योगी सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर, आज न्यायालयात या निर्णयावर सुनावणी पार पडली, त्यामध्ये हॉटेल चालक व खाद्यपदार्थांच्या दुकानदारांस मोठा दिलासा देण्यात आला आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!