राज्यावर अवकाळी पावसाचे सावट, आठवडाभर मुक्कामाची शक्यता, बळीराजा हवालदिल…


मुंबई : राज्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून राज्यातील बहुतांश भागाचा पारा हा ३० अंशाच्या वर गेला आहे. वाढत्या उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही झालेली असतानाचा आता राज्यात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई आणि पुण्यासह राज्याच्या विविध भागात हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून गारपीट होण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्यांनी आधीच त्यांची पिके काढली आहेत त्यांना नुकसान टाळण्यासाठी ते योग्यरित्या वाळवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार वारे आणि गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अवकाळी पावसापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पावसामुळे द्राक्ष पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे आणि नुकसान कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळीचे संकट असल्यामुळे शेतकऱ्याला द्राक्ष रॅकवर ५ एप्रिलनंतर टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचे संकट लक्षात घेता शेतकऱ्यांनी योग्य त्या खबरदारी घेण्याची गरज आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!