‘यशवंत’ च्या पहिल्याच विषयावरुन सभेत अभूतपूर्व गोंधळ ! आवाजी घोषणांनी सर्व विषय संचालक मंडळाकडून मंजुर ; गोंधळाने अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने निराशा…..

उरुळी कांचन : मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे या पहिल्याच विषयावर अभूतपूर्व गोंधळ झाल्याने संचालक मंडळाने सभासदांच्या आवाजी ठरावाने सभेपुढील सर्व विषय मंजुर करुन घेतले आहेत. मागील सभेचा इतिवृतांत कायम करणे, अहवाल , अर्थिक ताळेबंद स्विकारणे तसेच नफा-तोटा पत्रके स्विकारणे, भागभांडवल उभे करण्यास माध्यता देणे इ.महत्वाचा विषयांना संचालक मंडळाने आवाजी मताने मंजुरी करून सभा आटोपती घेतली आहे.

थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोलवडी- साष्टे येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.सभेपुढे मागील सभेचा इतिवृत्तांत कायम करणे तसेच अर्थिक,नफा -तोटा पत्रके, अहवाल, ताळेबंद स्विकारणे , महसुली वभांडवली अंदाजपत्रकाची नोंद घेणे तसेच भांगभांडवल उभाकरणे इ. प्रमुख मुद्दांसह सहा विषय सभेपुढे ठेवण्यात आले होते.मात्र सभेच्या पहिल्याच विषयावर प्रचंड गदारोळास सुरुवातझाली.
सभासद विकास लवांडे यांनी कारखाना संचालकमंडळ व कार्यकारी संचालक मंडळानी सभासदांची दिशाफूलकरीत असल्याचा मुद्दा सभेत मांडून संचालक मंडळाने २०२३ च्या सभेचा विषय सभेत मंजुरी या सभेत कशासाठी असा सवालउपस्थित केला. तर राज्य सहकारी बँकेच्या ओटीएस रक्कमेतकारखान्याचे २० कोटीचे नुकसान झाल्याचा आक्षेप नोंदविला तरपुणे बाजार समितीने तालुक्यातील सहा वर्षापूर्वी प्रति एकर ५ “कोटी रुपये खरेदी केली असताना कारखान्याची जमीन ३ कोटीरुपये दराने खरेदी करुन नुकसान केल्याचा आक्षेप घेतला तरआवश्यक जमीन विक्री करुन कारखाना सुरू करण्यासाठी काप्रयत्न झाले नाहीत ? असे आक्षेप नोंदवून कारखान्याने विक्री
गटाची चुकीची माहिती सभेला दिली असल्याची माहिती मांडली.

यावर काही सभासदांनी आक्षेप नोंदवित कारखाना कसासुरू करणार याची माहिती आम्हाला मिळून शेतकरी, कामगारदेणी अदा करुन रक्कम अदा करावी म्हणून गोंधळ घातला तरकाहींनी सभेचे विषय मंजूर असल्याचा आवाजी मुद्दावर संचालक
मंडळाने सभेचे विषय मंजूर करुन घेतले.
दरम्यान कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी प्रस्ताविकात कारखाना सुरू करण्यासाठी तालुक्यातील सर्व मंडळींचे सहकार्य होत असल्याचे सांगून कारखान्यापुढील १५७ कोटींचे विविध बँकांचे कर्ज एक रकमी योजनेतेन केवळ ३६ .५० कोटी रुपयांत बसवून परतफेड करून कारखान्यावरील सर्व बॅकांचा ताबा मोकळा केला आहे. त्यामुळे कारखाना कर्ज मुक्त झाला आहे.कर्जफेडीत काही सभासदांनी ठेवी दिल्या असून संचालक मंडळाने स्वखर्चातून साडेपाच कोटी रुपये बँकांची फेड केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना पुणे बाजार समितीशी विक्रीचा व्यवहारपारदर्शक करुन कारखाना सुरू होण्याचा दृष्टीपथात आहे. तर यांत्रिक दुरुस्तीला सर्व सभासदांना बरोबर घेऊन अर्थिक तोट्याचा निष्कर्ष काढून समिती मार्फत नवीन प्रकल्प की चालू प्रकल्प दुरुस्ती करुन पुढेजाण्याचा मनोदय व्यक्त केला.
कार्यकारी संचालक कौलास जरे यांनी मागील सभेचेमंजूर विषय सभेपुढे वाचून दाखवून सभेचा पुढील विषयाचीपरवानगी घेतली. दरम्यान कारखाना सुरू करणे, शेतकऱ्यांचव कामकार देणी तसेच अहवालातील आकडेवारीची तफावतआदी मुद्द्यावर सभेत गोंधळ झाल्याने संचालक मंडळाने आवाजीमुद्दांनी सभेचे सर्व विषय मंजूर करुन घेतले. दरम्यान सर्वसाधारण सभेसाठी पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद, कात्रज दूधदूध संघाचे संचालक गोपाळ म्हस्के, पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, संचालक रोहिदास उंद्रे, कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांच्यासह सर्व संचालक मंडळव्यासपीठावर उपस्थित होते.