हवेलीतील यशवंत कारखान्याच्या बिनविरोध निवडणूकीची शक्यता मावळली! दोन गटांनी पूर्ण केली पॅनेलची तयारी..!!


जयदिप जाधव

उरुळीकांचन : हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या व गेल्या १३ वर्षापूर्वी अर्थिक अनागोंदी कारभाराने बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंधरा वर्षानंतर होत असलेल्या निवडणूकीसाठी तालुक्यातील राजकीय नेत्यांचे एक- मत होण्याची चर्चेची प्रक्रिया निष्प्रभ ठरली आहे.’ओढात एक व पोटात दुसरे’ अशी राजकारण्यांची राजकीय पद्धत निवडणूक बिनविरोध होण्याचा आड आली आहे. कारखान्याचा जागावाटपात समेट घडविण्याची प्रक्रिया जागावाटपाचा प्रतिष्ठेपायी पुढे घडू न शकल्याने सर्वपक्षीय दोन गटांनी निवडणुकीत शड्डू ठोकण्याचा निर्णय घेतल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

हवेली तालुक्यातील गेल्या १३ वर्षापूर्वी बंद पडलेल्या यशवंत कारखान्याची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध व्हावी तसेच कारखाना नव्याने उभा रहावा म्हणून कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आणि प्रतिष्ठा, मानपान व गावकी भावकीची अस्मिता जागृत होऊन या निवडणुकीचीसंवेदनशीलता नेतेमंडळी विसरून गेली. तालुक्यातील व तालुक्या बाहेरील वरिष्ठ नेत्यांनी शिष्टाई करुनही गटा -तटाची प्रतिष्ठा व मानपानाच्या नाट्यात निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्नांवर पाणी फिरवून गेली आहे.

अर्थिक ताळेबंदी असलेल्या या कारखान्यावरील अवसायक रद्द करुन सभासदांनी निवडणुकीचा खर्च उचलून न्यायालयीन प्रक्रियेतून ही निवडणूक प्रक्रीया प्रत्यक्ष सुरू करण्याचा प्रयत्नांना यश मिळू शकले. अशावेळी निवडणूक बिनविरोध होणे हे सर्व सामुहिक शक्ती कारखाना सुरू करण्याचा प्रयत्नांना बळ देणारे होते. मात्र बैठकांत एक व पडद्याआड वेगळी कृती अशा चर्चा एकमतात न आल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा विस्कटली गेल्याची चर्चा आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम मुदतीअधिच परस्पर गटांनी पॅनेल उभे करण्याची अंतिम तयारी पूर्ण केल्याने निवडणूकीची शक्यता मावळली आहे.

दोन नेत्यांची शिष्टाई असफल!

यशवंत कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून राज्य सरकारमधील भविष्यात कारखान्याला भविष्यात मोठी शासनाची मदत होईल म्हणून प्रयत्न करणारे दौंडचे आमदार राहुल कुल व जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद यांनी स्वतः हा काही बैठका घेऊन या दोन गटांना एकत्र घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न असफल ठरल्याचे चर्चा आहे.

हे दोन गट लढणार एकमेकांविरोधात!

बाजार समितीला एकत्र लढले मात्र वर्षभरात एकमेकांपासून दूर झालेल्या दोन गटांत निवडणूकीची ठिणगी पेटली गेली आहे. त्यानुसार दोन गटांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या गटांत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, माजी संचालक महादेव कांचन, रोहिदास उंद्रे एका गटात तर विरोधी बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, माजी सभापती प्रताप गायकवाड, पंढरीनाथ पठारे, संचालक प्रशांत काळभोर यांचा विरोध गट अशा गटांत लढत होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!