केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बारामतीत घेतला सहकारी संस्थांचा घेतला आढावा…

बारामती : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी माळेगाव येथे ‘शरद’ संकुलाला सदिच्छा भेट देत तीन सहकारी संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेत पदाधिकारी, संचालक आणि सभासदांशी संवाद साधला. यावेळी माळेगावचे संचालक चंद्रराव तावरे, तसेच रंजन काका तावरे उपस्थित होते.
यावेळी मोहोळ म्हणाले, शरद संकुल येथून शरद सहकारी दूध व्यवसायिक संस्था, शरद नागरी सहकारी बिगर शेती संस्था आणि शरद विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी अशा तीन सहकारी संस्थांचे कामकाज चालते. रंजन तावरे यांनी स्थापन केलेल्या या तिन्ही संस्थांच्या संचालक मंडळाशी चर्चा करत संस्थांच्या वतीने वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनात आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात नुकतेच ‘राष्ट्रीय सहकार धोरण २०२५’ घोषित करण्यात आले आहे. या धोरणानुसार सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, संपतराव लोणकर, गोविंदराव धुमाळ, नंदकुमार खैरे, पी एल धुमाळ, जीबी अण्णा गावडे, शामराव कोकरे, राजाभाऊ देवकाते, केशवराव देवकाते, सूर्याजी देवकाते, शशी कोकरे, चिंतामणी नवले, संग्राम काटे, रमेश गोफणे, पांडुरंग कचरे, प्रकाश जगताप, अविनाश मोटे, भालचंद्र देवकाते यांच्यासह तिनही संस्थांचे संचालक उपस्थित होते.