पुण्यात गणपती विसर्जनाच्यावेळी दुर्दैवी घटना ; मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक, तरुण गंभीर जखमी…


पुणे : आज राज्यभरात सर्वत्र लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. अनंत चतुर्दशी दिवशी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अशा भक्तिमय वातावरणात पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील मोहन नगर येथे काल गणेशोत्सवाच्या मिरवणुकी दरम्यान दुर्घटना घडली. मिरवणूक सुरू असताना अचानक विजेचा शॉक लागून दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे मिरवणुकीला गालबोट लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाची मिरवणूक सुरू असताना डीजे साऊंडची गाडी विजेच्या खांबाला धडकली. या धडकेमुळे इलेक्ट्रिक वायर तुटून थेट जमिनीवर कोसळल्या. या तारा थेट मिरवणुकीत उपस्थित दोन तरुणांच्या अंगावर पडल्या आणि त्यांना जोरात शॉक बसला. या अपघातात प्रवीण राजेंद्र कुटे आणि अमोल सदाशिव चव्हाण गंभीर जखमी झाले.दोघांनाही तत्काळ उपचारासाठी चिंचवड येथील निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रात्री ११ वाजता त्यांना आयसीयूत हलवण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी एमएसईबीचे अधिकारी आणि भोसरी विभागातील कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले.गणेशोत्सवाच्या काळात डीजे गाड्यांमुळे वारंवार अपघात घडतात. त्यामुळे नागरिकांना उत्सवात काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!