Pune Crime : पुण्यातील बुधवार पेठेत मोठी कारवाई, पाच महिलांवर कारवाई, नेमकं घडलं काय.?


Pune Crime  पुणे : शहरातील बुधवार पेठ परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई (Pune Crime )करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करणार्‍या सात बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे.  या कारवाईत पाच महिला आणि दोन नागरींकांचा समावेश आहे. तर एका अल्पवयीन मुलीला देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. (Pune Crime)

तसेच या अल्पवयीन मुलीला बांगलादेशातून पुण्यात वेश्याव्यवसाय (Pune Crime)  करण्यासाठी आणण्यात आले होते. शहरातील बुधवार पेठ परिसरात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुन्हा एकदा ही मोठी केली आहे.

गेल्या पंधरा दिवसापूर्वी याच परिसरात बेकायदा वास्तव्य करणार्‍या तब्बल १९ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार पेठेत गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली होती.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने वेश्यावस्तीत छापा टाकून १० बांगलादेशी महिलांसह १९ जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरुद्ध पारपत्र अधिनियम १९५०, तसेच परकीय नागरिक आदेश १९७८ अन्वये फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!