अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळींची, न्यायालयाकडून मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश


नागपूर : महाराष्ट्र शासन २००६ निर्णयाच्या आधारे कुख्यात गुंड अरुण गवळीने शिक्षेतून सुट देण्याची मागणी करणारी एक याचिका केली होती. अरुण गवळीच्या या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पुर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता.

त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळी यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे.

मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणासह इतर गुन्हेगारी कृत्य यासाठी अरुण गवळीला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सध्या अरुण गवळी नागपूर येथील तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

काय आहे २००६ चा शासन निर्णय?
२००६ च्या शासन निर्णयानुसार वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळण्याची तरतूद आहे. त्यानुसारच कुख्यात गुंड अरुण गवळीने शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता गवळीची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!