बारामती नगरपरिषदेत काका -पुतण्यांची लढाई; कोण मारणार बाजी?

बारामती :संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती नगर परिषदेची निवडणूक काल पार पडली .या नगरपरिषदेची मतमोजणी आज होत असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. एकीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाने योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली आहे. यामध्ये बाजी कोण मारणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
.
बारामती नगर परिषदेसाठी 66.92% मतदान पार पडलं एकूण 41 जागांसाठी ही निवडणूक झाली असून, त्यापैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदासाठी बसपचे उमेदवार काळूराम चौधरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन सातव यांच्यात थेट लढत आहे. मतमोजणीची तयारी बारामती येथील देशपांडे महाविद्यालयात पूर्ण झाली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.निवडणुकीत अजित पवारांचे 35 नगरसेवक निवडून येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान जनतेचा कौल कोणाला असणार हें पाहणे आज महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान राज्याच्या राजकारणात दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असतानाच, बारामतीत मात्र हे दोन्ही गट परस्परांविरोधात लढले आहेत. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे
