राज्यसभेवर नियुक्त होताच उज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया ;’ ती’ खंत बोलून दाखवली, म्हणाले….


पुणे : उच्चस्तरीय गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून आपली छाप पडणारे ज्येष्ठ आणि प्रख्यात कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत लोकसभा निवडणुकीवेळची खंत व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी मी लोकसभेपुरता त्यात होतो. मात्र ही निवडणूक एका वेगळ्या मुद्द्यावर लढवली गेली ज्यात जास्त गैरसमज पसरवले गेले. या गैरसमजाला अनेक लोक बळी देखील पडले परिणाम जेव्हा लोकांच्या लक्षात आले तेव्हा आपले चुकलं असं त्यांना समजलं. कसाबच्या गोळीने आमच्या शहिदांच्या हत्या झाल्या नाहीत असेही पसरवलं पण हा गैरसमज विधानसभेला जनतेने हाणून पडला. आमची जनता ही साक्षर आहे मात्र काही राजकीय शक्ती विसरतात त्यांनी ते विसरू नये हीच माझी सूचना आहे असे उज्वल निकम यांनी स्पष्ट सांगितले.

ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याबरोबरच भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष आभार मानले.तसेच भाजप पक्षाने माझ्यावर लोकसभा निवडणुकीवेळी जो विश्वास प्रकट केला होता, तो यावेळी सार्थ करुन दाखवेन, असे उज्जवल निकम म्हणाले.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!