Ujani Dam : उजनीत ६ जणांचा प्रवास ठरला काळ, जोरदार वादळी वाऱ्यामुळे बोट उलटून ६ जण बेपत्ता, एनडीआरएफ पथकाकडून शोध मोहिम सुरू….


Ujani Dam : उजणी धरणाच्या पात्रात, भीमा नदीत काल संध्याकाळी वाहतूक करणारी बोट उलटली. वादळीवाऱ्याने हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. या बोटीमध्ये सात प्रवासी होते. त्यापैकी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आपला जीव वाचवण्यात यश आले.

तब्बल सहा जण भीमा नदी व उजनीच्या पात्रात बुडाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेत दोन लहान मुलांसह एक महिला व तीन पुरुषांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. Ujani Dam

या ठिकाणी इंदापूरसह पुणे जिल्ह्यातील व सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा महसूल यंत्रणा व पोलीस यंत्रणा बचाव कार्यात पोचली आहे. दरम्यान राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन पथकाला देखील दोन्ही जिल्ह्यातून पाचारण करण्यात आले असून काही वेळातच हे दोन्ही ठिकाणची पथके या ठिकाणी पोहोचतील असे सांगितले जात आहे.

नेमकं काय घडलं

करमाळा तालुक्यातील कुगाव येथील सात जणं बोटीने इंदापूर तालुक्यातील कळशी येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान जोरदार हवेने प्रवासात अडथळे येत होते. वादळीवाऱ्याने ही बोट उलटली. बोट भीमा नदीत बुडाली. या नावेत एकूण सात प्रवासी होते.

त्यात एक वर्षांचे मुल असल्याचे समोर येत आहे. त्यातील एक प्रवाशी पोहता येत असल्याने पोहत किनाऱ्यावर आला. वादळी वारे आणि जोरदार पावसाने हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. Ujani Dam

स्थानिक ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत कुगाव येथील एक दाम्पत्य कळाशीकडे येत होते. कळाशी येथील माहेर वाशिण महिला तिच्या दोन मुलांसह व पतीसह माहेरी येत असताना दीपत्य झाले असल्याने कळाशी गावातील या महिलेच्या कुटुंबीयांसह व नातेवाईकांसह सर्व ग्रामस्थ उजनी काठावर थांबून आहेत.

दरम्यान येथील बचाव कार्यावर पुणे जिल्ह्यातील व सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी लक्ष ठेवून आहेत. स्थानिक मच्छीमारांची तसेच पाणबुड्यांची देखील मदत घेतली जात असून स्थानिक नागरिकही या ठिकाणी बचाव कार्यासाठी थांबून आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!