मुडदे पडून विकास होऊ देणार नाही ; कोकणातील रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची उध्दव ठाकरेंची भेट

मुंबई : उद्धव ठाकरे आज कोकण दौ-यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध करणा-या लोकांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरी विरोधात घोषणाबाजी केली. लोकांचा विरोध असल्यास रिफायनी होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा डाव आखल्या जात आहे. मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. रिफायनरीचं समर्थन करुन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्त्यांनी दिले आहे. मी मन की बात करायला आलो नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
रिफायनरी गुजरातला न्या आणि आमचा एअर बस, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणा. वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्रात आणि चांगले प्रकल्प गुजरातला गेले. हे चालणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हुकूमशाहीचा विचार केला तर हुकूमशाही मोडून काढू, असा इशारा देखील ठाकरे यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांची ३३ देशांमध्ये गद्दार म्हणून ओळख झाली आहे. या गद्दारांना हाराष्ट्रातील ३ जिल्हे देखील ओळखत नव्हते. समृद्धी महामार्ग होताना देखील मार्ग काढला अनेक शेतक-यांच्या फळबागा नष्ट होत होत्या, मी जाऊन मार्ग काढला, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले