उद्धव ठाकरेंचं भाषण सडक अन नासलेलं ; दसरा मेळाव्यावरून भाजपच्या आमदाराचा टोला


पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. या मेळाव्यावरून आता भाजपने उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली आहे.भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण सडक आणि नासलेलं असल्याचं म्हटलं आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय अवस्थेवर बोट ठेवल आहे.ते म्हणाले, ठाकरे यांचं भाषण सडकं आणि नासलेल आहे. तसेच हिंदुत्व सोडल्यानंतर गर्दी कशी कमी होते, याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राच्या जनतेने आज पाहिले, असा टोला अमित साटम यांनी लगावला. तुम्ही हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर गेल्यामुळेच पक्षाची आणि नेतृत्वाची आज दयनीय अवस्था झाली, असा आरोप अमित साटम यांनी केला आहे. या आरोपाला आता ठाकरे काय उत्तर देणार ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..

कोविडमध्ये मुंबईकर म्हणत असताना तुम्ही बेस्ट सीएम कसे झालात? हे कसं मॅनेज करून घेतलं, याची थोडीशी माहिती आपण महाराष्ट्राच्या जनतेला दिली असती तर बरं झालं असतं, असा टोला अमित साटम यांनी लगावला.मुंबईतील नाक्या नाक्यावर आणि कट्ट्या कट्ट्यावर चर्चा होणार, ती फक्त तुमच्या भ्रष्टाचाराची आणि राजकारणाचीच. तुमच्या भ्रष्टाचाराच्या, आतंकवादाचा आणि मतांच्या रावणाचं दहन होणार म्हणजे होणारच, असे विधान अमित साटम यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून भाजपवरही जोरदार टीका केली. आम्हाला जर तुम्ही हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही भाजपला परत सांगतो की, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग तुम्ही काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा मारा. तुमचं ते फडकचं आहे कारण तो भगवा असू शकत नाही कारण भगवा हा शिवसेनेच्या हातात आहे असं त्यांनी खडसावून सांगितलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!