मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी फेरनियुक्ती होणार…
मुंबई : सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. सत्तासंघर्ष प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. ठाकरे गटात घडामोडींना वेग आला आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या १८ जूनला मुंबईत होणा-या राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राज्यभरातील पदाधिका-यांच्या बैठकीत पुन्हा पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर व तांत्रिक त्रुटी राहू नयेत यासाठी ठाकरे गट पुढील रणनीती आखत आहे. यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन ठाकरे गटाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
ठाकरे गटाच्या राज्य कार्यकारिणी आणि राज्यभरातील पदाधिका-यांची बैठक आणि मेळावा आज मुंबईत होणार आहे. यात उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षप्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे.
Views:
[jp_post_view]