Uddhav Thackeray : ठाकरेंच्या गडाला सुरुंग, मराठवाड्यातील बडा नेता भाजपत जाणार? चर्चांना उधाण….


Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच पक्षांनी तिकीट नाकारल्याने नाराज नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हेदेखील लवकरच भाजपत जाणार असल्याचे म्हटले जात आहे. संभाजीनगरची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात. यावरच भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. अंबादास दानवे यांचे विचार आमच्यापेक्षा काही वेगळे नाहीत. ते पूर्वाश्रमीचे भाजपचेच आहेत, असे दानवे म्हणालेत. Uddhav Thackeray

आमच्या विचारांशी सहमत असणाऱ्या लोकांना पक्षात आणण्याचे काम आम्ही पहिल्यापासून करत आलो आहोत. ज्या घटना घडतील त्याची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू, असे अंबादास दानवे म्हणाले. अंबदास दानवे यांच्याशी संपर्क झाला आहे का, अशा प्रश्न रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आला.

यावर बोलताना अंबादास दानवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचेच आहेत. भाजप आणि अंबादास दानवे यांचे विचार काही वेगळे नाहीत. पण ते त्यांच्या पक्षाचं काम करतात आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो. त्यांच्याशी आमचा थेट संपर्क झाला नाही, असे दानवे यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!