Uddhav Thackeray : बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण….! उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरलं
Uddhav Thackeray : बदलापूरमधील शाळेत चार वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे राज्यभरात सध्या संतापाचा आगडोंब उसळला आहे. मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
आता याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. सुरक्षित बहीण ही प्राथमिकता असली पाहिजे. बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील कानाकोपऱ्यात वातावरण झालं पाहिजे की कुणीही असं दुष्कृत्य करायला धजावला नाही पाहिजे. कोणी केलं तर त्याला ताबडतोब शिक्षा होते, ही भीती त्याच्या मनात व्हावी म्हणून हा बंद करत आहोत. असे ते म्हणाले. Uddhav Thackeray
ते पुढे म्हणाले, कोरोना व्हारसशी लढलो, तसा हा विकृतीचा व्हायरस आहे,. राज्यातील कानाकोपऱ्यात वातावरण झालं पाहिजे की कुणीही असं दुष्कृत्य करायला धजावला नाही पाहिजे.
कोणी केलं तर त्याला ताबडतोब शिक्षा होते, ही भीती त्याच्या मनात व्हावी म्हणून हा बंद करत आहोत. त्यामागे राजकारण नाहीये. सुरक्षित बहीण ही प्राथमिकता असली पाहिजे. बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.