‘उद्धव ठाकरेंची ती मोठी चूक होती’; सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य…!

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचं मत नोंदवलं आहे. सरन्यायाधिशांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर भाष्य करत ती उद्धव ठाकरेंची मोठी चूक असल्याचं म्हटलं आहे.

सरन्यायाधिशांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी बोलताना जे झालं ते आम्ही बदलू शकत नाही, असं म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्याच वेळी अधिकार गमावला. तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला असता आणि 39 आमदारांमुळे हरला असता तरीही आम्ही चाचणी रद्द केली असती, असं वक्तव्य सरन्यायाधीशांनी केलं आहे.

Views:
[jp_post_view]