उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर! शिंदेसोबत खासदारांच्या बैठकीची चर्चा; अरविंद सावंतांना तातडीने बोलवून घेतलं अन्…..

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या खासदारांना फोडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. ठाण्यात दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांना मातोश्रीवर बोलावले होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांना मातोश्री बोलावले. या दोघांच्या मध्ये बैठक झाली.या बैठकीत खासदार फुटणार याबाबत चर्चा झाल्या नाही. आजची बैठकी शिवसेना आणि भारतीय कामगार सेनेच्या कारभाराबाबत होती अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली.
अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना असं म्हटलं की, खासदार फुटीबाबत असा कोणताही विषय झाला नाही. त्यांनी सहज म्हटलं की लिहून देणार का?मी म्हटलं लिहून देतो,त्यात असं काही विशेष नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. दरम्यान अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले लोकसभेवर गेले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू अशी अरविंद सावंत यांची ओळख आहे. ठाकरेंच्या खासदार फुटीवर त्यांनी बोलताना अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याची अफवांना आणि चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
