Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Uddhav Thackeray : नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
खरं तर उद्धव ठाकरे आज नागपूरला अधिवेशनानिमित्त दाखल झाले होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांनी फडणीवसांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे आता उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
त्यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते अनिल परब, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई हे देखील त्यांच्यासोबत होते. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
महाराष्ट्रात सुस्कृंत राजकारणाची अपेक्षा आहे. त्यांचे सरकार स्थापन झालेले आहे. दुर्देवाने आमचे सरकार आले नाही. महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. ते कसे जिंकले हे अनाकलनीय आहे. आम्ही जनतेच्या माध्यमातून हा प्रश्न मांडू. देवेंद्र फडणवीस यांची भेट कशासंदर्भात होती ते कळेल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.