Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार मुंबई भाजपचे अध्यक्षचे आशिष शेलार यांनी केली आहे. मतदान प्रक्रिया सुरु असतानाच ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली, असा आरोप त्यांनी केला आहे.

सत्ताधारी भाजपावर बिनबुडाचे आरोप करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत. हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहे. आयोगाकडून पक्षपातीपणा करण्यात येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. Uddhav Thackeray
पुढे बोलताना ते म्हणाले की, मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय. मतदारांनी मतदानाला उतरवू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे, असंही ठाकरेंनी म्हटले होते.उद्धव ठाकरेंनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.

दरम्यान, ठाकरेंनी पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले, तेच मुद्दे निवडणूक आयोगापुढे शेलार यांनी मांडले आहेत. ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली, असं म्हणत आशिष शेलार यांनी कारवाईची मागणी केली आहे. संथ मतदानावरुन उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली आहे.