ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जोरदार झटका! 1 ते 2 कोटी पैसे मागितल्याच्या आरोपाने खळबळ..


मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकींसाठी प्रचार सुरु झालेल्या असून अशातच आता उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मागच्या काही दिवसांपासून सगळ्याच पक्षात पक्षांतराचा सिलसिला सुरु आहे. आधी तिकीटांच्या आश्वासनावर पक्षांतर होत होती.

आता ज्या पक्षात आहोत, तिथे तिकीट मिळालं नाही म्हणून रागापोटी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला जात आहे. असचं ठाण्यात घडलं आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने धक्का दिला आहे.

ठाकरे गटाचे परिवहन समितीचे माजी सभापती, माजी नगरसेवक विजय काटकर कुटुंब यांनी शेकडो समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम काझीही यांनीही शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

1 ते 2 कोटींची मागणी…

तिकीट वाटपात अन्याय झाला. निष्ठेला किंमत नाही, पैशालाच किंमत आहे. उमेदवारीसाठी ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी 1 ते 2 कोटींची मागणी केली, असा गंभीर आरोप विजय काटकर आणि त्याच्या मुलीने केला. ठाणे, कल्याण-डोंबिवली हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!