आळंदीत उद्यापासून हिंदू महोत्सव -२०२५ ची सुरुवात! आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार महोत्सवाचे उद्घाटन..

उरुळी कांचन : अयोध्या येथील श्री रामचंद्रप्रभु मूर्ती प्राणप्रतिष्ठा प्रथम वर्धापनदिन पर्वकाळाचे औचित्य हिंदू महोत्सव-२०२५ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती सकल हिंदू समाजाचे संपर्क प्रमुख समाजप्रबोधनकार ह.भ.प. संग्राम भंडारे यांनी दिली आहे.

या ‘हिंदू महोत्सवाचे २०२५’ चे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून या महोत्सवाचे आयोजन फ्रुटवाले धर्मशाळा प्रांगण, प्रदक्षिणा रोड, आळंदी देवाची, (ता. राजगुरुनगर) बुधवार (ता.२२) या ठिकाणी दुपारी ४ वाजता येथे करण्यात येणार आहे.
या महोत्सवात प्रखर हिंदुत्ववादी वक्ते गागरभाऊ बेग, ह.भ.प. सुप्रियाताई साठे, रविदादा पडवळ, ऋत्विकांजी कुलकर्णी, ह.भ.प. संदिप लोहर, कुणालभाऊ साठे, सौरभाजी कार्डे , संतोषजी लोखंडे, गणेशजी गरुड, ज्ञानेश्वरजी बनसोडे उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके, जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे, राजगुरुनगरचे आमदार बाबाजीशेठ काळे, पुणे जिल्हाध्यक्ष शरदजी बुट्टे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव, मंगेशदादा चिवटे, आळंदीचे नगराध्यक्ष राहुलशेठ चिताळकर, मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, संगमनेरचे आमदार अमोलदादा खताळ, चिंचवडचे आदर शंकरशेठ जगताप, शिरूर तालुक्याचे आमदार ज्ञानेश्वर आबा कटके, मावळ येथील शिवभक्त अनिकेतभाऊ घुले, युगंधर सेवाभावी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हर्षदाताई संजय शिरसाट, यतीनभाऊ कदम (संचालक, कृ.उ.बा.स. पिंपळगाव ब.), रविंद्रभाऊ रंधवे (पुणे जि. उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी हे या महोत्सवात उपस्थित राहणार आहे.