शिर्डी- नाशिक महामार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक, सैन्य दलातील जवानासह दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर..
शिर्डी : शिर्डी-नाशिक मार्गावरील पाथरी शिवारात रविवारी (ता. १६) रोजी दुपारी ३ वाजता वळणावर दोन दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
या अपघातात सैन्य दलातील जवानाचा मृत्यू झाला असून, सोनेवाडी येथील तरुणाचादेखील मृत्यू झाला. तर, मृत पावलेले दोघेही तरुण एकमेकांचे मावसभाऊ असल्याची माहिती आहे.
अक्षय पाटीलला जावळे (२५, रा. सोनेवाडी ता. कोपरगाव जि. अहमदनगर) व आर्मी मेजर सचिन राजाराम गुजर (वय.२४ रा. धानोरे ता.निफाड जि, नाशिक), अक्षय गायकवाड (रा. खेडलेझुंगे ता. निफाड जि. नाशिक) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सिन्नर येथून पल्सर मोटरसायकल (एम. एच. 15 एच ए 9006 ) अक्षय जावळे व आर्मी मेजर सचिन गुजर हे कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडीला येत असताना अक्षय गायकवाड यांच्या प्लेटिना (एम. एच. 15 डीबी 9670) ही दुचाकी विरुद्ध बाजूला वळत असताना जोराची धडक झाली.
अपघाताचा आवाज ऐकून पाथरेचे सरपंच मच्छिंद्र चिने, मनोज गवळी यांनी मोबाईल व आधार कार्डचा संदर्भ घेत नातेवाईकांना या संदर्भात कल्पना दिली. अपघातात जखमी झालेल्या या तिघांनाही तातडीने शिर्डी येथे सुपरहॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
अक्षय जावळे यांचा दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच रविवारीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरने सांगितले, तर मेजर सचिन गुजर यांच्यावर उपचार चालू होता मात्र उपचाराला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचाही सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या दुःखद निधनाने सोनेवाडी व धानोरे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
तर शिर्डी येथे उपचारादरम्यान सोमवारी ११ वाजता सचिन गुजर यांचा मृत्यू झाला. अक्षय गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर शिर्डी सुपर स्पेशलिटीमध्ये उपचार सुरू आहेत.