शेतकर्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचे दोन हजार ‘या’ दिवशी खात्यात, सरकारची घोषणा..

नवी दिल्ली : पीएम किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा आता संपली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच हा हप्ता जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता 13 मार्च रोजी जमा होऊ शकतो. केंद्र सरकारने पण याविषयीची अधिकृत तारीख घोषीत केली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पीएम किसानच्या अधिकृत खात्यावरून सरकारने अंतिम तारखेची घोषणा केली आहे. पीएम किसानच्या अधिकृत खात्यावरून याविषयीची एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यानुसार, तीन दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे जमा होण्यास सुरूवात होणार आहे.
….तरच येणार खात्यात पैसे
पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता कधी जमा होणार याची शेतकऱ्यांमध्ये प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे. समाज माध्यमावर केलेल्या पोस्टनुसार शेतकरी सन्माननिधी योजनेचा हप्ता येत्या 13 मार्च रोजी जमा होईल.

याविषयीची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यापूर्वी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर या तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तरच हप्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
या शेतकऱ्यांना लाभ नाही
शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा सेवानिवृत्त असतील त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 10 हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आयकर भरणारे शेतकरी या योजनेच्या परीघाबाहेर आहेत.
पीएम किसान योजनेतंर्गत काही नियम बदलण्यात आले आहे. त्यानुसार एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच योजनेचा लाभ मिळेल. इतर सदस्यांचा पत्ता कट होईल. पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली आली आहे.